शियेच्या महादेव दूध संस्थेत राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीचा एकतर्फी विजय

शियेच्या महादेव दूध संस्थेत राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीचा एकतर्फी विजय
Published on

राजा शिवछत्रपती सहकार
आघाडीचा एकतर्फी विजय
शिये, ता. २५ : शिये (ता. करवीर) येथील श्री महादेव सहकारी दूध व्यवसायिक व कृषिपूरक सेवा संस्था मर्यादित ;शियेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीने पंधरापैकी पंधरा जागांवर विजय मिळविला. भुजंगेश्वर महादेव महायुती पॅनलला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.
संस्थेच्या २०२५-२०३० साठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान आणि मतमोजणी झाली. एकूण १०६१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते : सर्वसाधारण गट - अशोक आनंदा पाटील (५९६), शहाजी सर्जेराव काशीद (५८९), श्रीधर कृष्णा चौगुले (५८६ ), पंकज पिलाजी मगदूम (५६९), अक्षय एकनाथ पाटील (५६७ ), अमर जयसिंग पाटील (५६५ ), स्वप्नील सुनील पाटील (५४९), दिग्विजय तुकाराम पाटील (५४५), बाळासाहेब बाबूराव इंगवले (४९५) आणि बाबासाहेब रायगोंडा पाटील (४६३). महिला राखीव गट - जयश्री प्रवीण चव्हाण ( ६०७ ) व मालुबाई पांडुरंग चौगुले (५३५). इतर मागास वर्ग - स्वागत विलास गुरव (६४९)ः अनुसूचित जाती जमाती - सदाशिव दत्तू मोरे (६२०)ः विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग - तुकाराम शंकर बुवा (५३७)ः विजयी राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी केले. निकालानंतर विजय आघाडीने गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजय साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com