
नानीबाई चिखली - पोस्टर प्रदर्शन
01798
देवचंद कॉलेज ः येथे पोस्टर प्रदर्शनात माहिती घेताना प्राचार्य डॉ. शाह.
‘देवचंद’मध्ये पोस्टर प्रदर्शन
नानीबाई चिखली ता. 3 ः विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रमाचा भाग तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व शिक्षणाचा भाग म्हणून अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजमध्ये पोस्टर प्रदर्शन भरविले. प्रदर्शनात बारावीच्या वर्गातील व्यवसाय अभ्यासक्रम, कार्यालय व्यवस्थापन, विपणन व विक्रयकला, लघुउद्योग, स्वयंरोजगार, लेखाकर्म आदी विषयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रशांत शाह म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कला व कौशल्यांना वाव देऊन व्यक्त होणे गरजेचे आहे.’ व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख शिवाजी पोवार यांनी स्वागत, बिपीन पाटील यांनी प्रास्ताविक केले. निर्मला पाटील, महेश हगलदिवटे, सागर खोत यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य अशोक पवार, पर्यवेक्षक प्रभाकर जाधव उपस्थित होते. संस्थाध्यक्ष आशीष शाह, उपाध्यक्ष डॉ. तृप्ती शाह, सुबोध शाह यांचे सहकार्य लाभले. यावेळी भैरू कुंभार, नितीन कोले, विष्णू पाटील, राणी सोकासने, सुधा आरबोळे, वर्षा मोहिते, आशा साळुंखे, विनायक कुंभार, सदानंद झळके उपस्थित होते. वैभव पाटील यांनी आभार मानले.