नानीबाई चिखली - दुषित पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - दुषित पाणी
नानीबाई चिखली - दुषित पाणी

नानीबाई चिखली - दुषित पाणी

sakal_logo
By

01810
कोल्हापूर ः प्रदूषण नियंत्रण मंडळास निवेदन देताना कौलगेवासीय.

मंडलिक कारखान्याचे
सांडपाणी वेदगंगेत

कौलगेवासीयांचे ‘प्रदूषण नियंत्रण’ला निवेदन

नानीबाई चिखली, ता. ७ ः हमीदवाडा (ता. कागल) मंडलिक कारखान्याचे मळीमिश्रित रासायनिक पाणी ओढ्यावाटे थेट वेदगंगा नदीपात्रात मिसळत आहे. प्रदूषित पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावात जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती आहे. आठ दिवसांत कारखाना प्रशासनाविरोधात कारवाई झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा कौलगेवासीयांनी निवेदनातून दिला आहे.
कौलगेत जॅकवेललगतच मळीमिश्रित पाणी ओढ्यामार्फत वेदगंगेत मिसळते. हेच पाणी जॅकवेलमध्ये येत असल्याने याच पाण्याचा गावाला पाणीपुरवठा होतो. पाण्याचे नमुने जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासले असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल मिळाला आहे. यावेळी कौलगे सरपंच गजानन कांबळे, उपसरपंच अरुण पाटील, म्हाकवे सरपंच सुनीता चौगुले, महादेव चौगुले, के. के. पाटील, संजय पाटील, केरबा माने, बाळासो पाटील, धोंडीराम पाटील, नंदकुमार पाटील, राजेंद्र पाटीलसह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------
कोट
सांडपाणी नदीत मिसळू नये याची खबरदारी घेतली आहे. गरजू शेतकऱ्यांना टँकरद्वारे सांडपाण्याचा पुरवठा होत आहे. वेस्ट वॉटर लगून बंधाऱ्याचे नियोजन असून तो पूर्ण होताच नदीपात्रात सांडपाणी मिसळणार नाही.
- एन. वाय. पाटील, कार्यकारी संचालक, मंडलिक कारखाना

मंडलिक कारखान्याचे मळीमिश्रित पाणी वेदगंगेत मिसळत आहे. पाण्यातील जलचर प्राणी मृत झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कारवाई करावी; अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील.
- गजानन कांबळे, सरपंच, कौलगे