नानीबाई चिखली - सुरक्षा सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - सुरक्षा सप्ताह
नानीबाई चिखली - सुरक्षा सप्ताह

नानीबाई चिखली - सुरक्षा सप्ताह

sakal_logo
By

01828
नानीबाई चिखली ः पारितोषिक वितरण समारंभात बोलताना रवींद्र नुल्ले. यावेळी कविता नाईक, सुनील माळगे

चिखली इंग्लिश स्कूलमध्ये
वाहतूक सुरक्षा सप्ताह
नानीबाई चिखली ता. १७ ः आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाने राजहंस बनावे. जेणेकरून योग्य गोष्टी घेतल्या जातील, असे प्रतिपादन उजळाईवाडी वाहतूक केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नुल्ले यांनी केले.
येथील चिखली इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण, वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थाध्यक्ष अरुण देवर्षी अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता नाईक, पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे, मुरगूडचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे उपस्थित होते.
कविता नाईक म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी अठरा वर्षांनंतरच वाहन हातात घ्यावे. सुरक्षित नियमांचे पालन करीत वाहन चालवावे.’ सुनील माळगे म्हणाले, ‘देश चालवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असून त्यांनी चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये.’ गावचे सुपुत्र, राष्ट्रपती शौर्य पोलिसपदक विजेते रवींद्र नुल्ले यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवडीबद्दल सत्कार झाला. यावेळी क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविले. मुख्याध्यापक सुरेश मगदूम यांनी प्रास्ताविक केले. कुमार ढेरे, राहुल देसाई, शरद बोरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कुंभार यांनी सूत्रसंचालन, एस. एस. सिरसे यांनी आभार मानले.