नानीबाई चिखली - स्मशानभूमी

नानीबाई चिखली - स्मशानभूमी

Published on

02008, 02010

नानीबाई चिखलीत पंचशीलनगरला अखेर स्मशानभूमी
नानीबाई चिखली, ता. ६ ः पस्तीस वर्षे स्मशानभूमीपासून वंचित येथील पंचशीलनगरला अखेर हक्काची स्मशानभूमी मिळाली. माजी महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले यांच्या निधीतून सुसज्ज स्मशानभूमी आकारास आली.
१९७२ पूर्वी गावच्या उत्तरेला तीस-चाळीस घरांची दलित वस्ती होती. वेदगंगेच्या पुराचे पाणी दलित वस्तीत येत असल्याने गावच्या पूर्वेला वस्तीला जागा दिली. ही वस्ती पंचशीलनगर होय. आज हरिजन, मातंग, चर्मकार अशी ३६० कुटुंबे राहत आहेत. येथे रस्ते, गटारी, लाईट, पाणी सोयीसुविधा असल्या तरी स्मशानभूमी नव्हती. १९८५ पर्यंत चिकोत्रा नदीकाठी नागरिक मृतदेहाचे दफन करीत. कालांतराने वैयक्तिक मालकीच्या थळोबाचा माळ खुल्या जागेत दहन होत असे. वाढलेली वस्ती, सोयी-सुविधांची वानवा, पावसाळ्यातील अडचणी अशा अवस्थेत उघड्यावरच मृतदेहांना अग्नी दिला जात असे. याचे गांभीर्य ओळखत शिवानी भोसले यांनी १५ व्या वित्त आयोगातून दहा लाखांचा निधी दिला. नंतर चिकोत्रा नदीजवळ एक गुंठ्यात सर्व सोयीनीयुक्त स्मशानभूमी उभारली. याकामी तत्कालीन सरपंच छाया चव्हाण, विद्यमान सरपंच अल्लाबक्ष सय्यद, उपसरपंच विजय घस्ती, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा, सदस्य तसेच सर्व गटांतील नेत्यांची मदत झाली. -
--------------
चौकट
दै. ‘सकाळ’ने उठविला आवाज
पंचशीलनगरमधील ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी अनेकदा अर्ज, विनंती केली. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. ‘सकाळ’ने ‘पंचशीलनगर स्मशानभूमीपासून वंचित’ वृत्ताद्वारे प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली.

कोट
जागेची अडचण दूर झाल्यानंतर निधीतून सहा महिन्यांतच स्मशानभूमी उभी केली. कित्येक वर्षांचा प्रश्न सुटल्याने समाधान वाटते.
- शिवानी भोसले, माजी महिला व बालकल्याण सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.