‘बिद्री’च्या बदनामीचे षड्‍यंत्र थांबवा ः प्रवीणसिंह भोसले

‘बिद्री’च्या बदनामीचे षड्‍यंत्र थांबवा ः प्रवीणसिंह भोसले

Published on

‘बिद्री’च्या बदनामीचे षड्‍यंत्र
थांबवा ः प्रवीणसिंह भोसले

सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. ४ ः ‘बिद्री साखर कारखाना ६५ हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे. राज्यात एक नंबरवर असलेल्या या कारखान्यावर केलेली कारवाई शेतकरी सभासदांच्या मुळावर उठणारी आहे. त्यामुळे कारखाना बदनाम होत असून, बदनामीचे षड्‍यंत्र वेळीच थांबवा, अन्यथा याचे उत्तर जनता योग्यवेळी आपल्याला सव्याज देईल,’ असा इशारा कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी दिला.
येथे आयोजित ऊस उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले होते. यावेळी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, माजी सरपंच महम्मद मुल्लाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘बिद्री कारखाना दराच्या बाबतीत राज्यात एक नंबरवर आहे. कारखान्याने स्थापनेपासूनच सभासदांच्या हिताचा कारभार केला आहे. कारखान्याकडून उच्चांकी दर, कामगार पगार, तोडणी बिले व ऊस बिले वेळेवर अदा केली आहेत. मात्र, अलीकडे कारखान्याच्या प्रगतीमध्ये राजकारण करून वारंवार अडथळे आणले जात आहेत. यामध्ये को जनरेशन प्रकल्पात टॉवर लाईनमध्ये अडथळा आणून एक वर्ष आर्थिक नुकसान केले आहे. गाळप क्षमता वाढीच्या वेळेस तर दोन वर्षे प्रस्ताव प्रलंबित ठेवून अडवणूक केली. उच्चांकी दर देणाऱ्या कारखान्याची चाचणी ऑडिट करण्याचा आदेश दिला तरीही यातून काहीच माहिती मिळत नाही म्हटल्यावर डिस्टिलरी प्रकल्प, मोलॅसिस परवाना रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. या सर्व गोष्टी पाहता सभासदांच्या अन्नात विष कालवण्याचा हा प्रकार आहे. या गोष्टी वेळीच थांबवा, अन्यथा याचे उत्तर जनता योग्यवेळी आपल्याला सव्याज देईल.’
यावेळी सचिन सूर्यवंशी, वैभव गळतगे, पांडुरंग गळतगे, उत्तम पाटील, प्रकाश वाडकर, रघुनाथ गायकवाड, विक्रम गळतगे, अजित बेनाडे तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते. महेश गळतगे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.