नृसिंहवाडीत नारदीय कीर्तन संमेलनास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडीत नारदीय कीर्तन संमेलनास प्रारंभ
नृसिंहवाडीत नारदीय कीर्तन संमेलनास प्रारंभ

नृसिंहवाडीत नारदीय कीर्तन संमेलनास प्रारंभ

sakal_logo
By

नारदीय कीर्तन संमेलनास
नृसिंहवाडीत शोभायात्रेने प्रारंभ

नृसिंहवाडी ता. १५ : येथे श्री जगदगुरु शंकरचार्य महासंस्थान, शृंगेरी व श्री दत्त देव संस्थान नृसिंहवाडी यांच्या वतीने नारदीय कीर्तनकार संमेलन आणि धर्मजागरण प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील संगम घाटावर करणेत आले असून हे संमेलन शुक्रवार (ता. १७) अखेर चालेल.
तीन दिवस चालणाऱ्या कीर्तन संमेलनास आज दुपारी ५ वाजता शोभायात्रेने सुरवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढणेत आली होती. यामध्ये रथ व पालखीसमवेत परांपरिक वेशभूषा केलेले शेकडो स्त्री-पुरुष कीर्तनकार व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दत्त नामाच्या जयघोषात व ताल मृदुंगाच्या गजरात शोभा यात्रा झाली. दीपप्रज्वलन झालेनंतर दत्त देव संस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी स्वागत केले. मंगलाचरणाच्या कीर्तनाने संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री १० वा. आजचे कीर्तन झाले. यावेळी दत्त देव संस्थानचे विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी, गोडबोले गुरुजी, अॅड. सतेज कुलकर्णी (सातारा), शरदबुवा घाग आदी व अनेक ठिकाणांहून आलेले शेकडो कीर्तनकार व ग्रामस्थ उपस्थित होते. या सम्मेलनात उपासना, चिंतन, श्रीकृष्णालहरी पठण होऊन पद्मश्री डॉ. गौरीशंकरजी (महाप्रबंधक श्री शारदा पीठम शृंगेरी) यांच्या हस्ते कीर्तनकारांचा सत्कार होऊन तीन सत्रांत संमेलन होणार आहे. शुक्रवारी (ता.१७) समारोपाच्या कीर्तनाने सांगता होईल.