नृसिंहवाडी त ग्राम दिंडीने सांगता

नृसिंहवाडी त  ग्राम दिंडीने सांगता

00991
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी
उत्सवाची नृसिंहवाडीत सांगता

नृसिंहवाडी ता. ६ : येथील दत्त मंदिरात गेले आठ दिवस चालू असलेल्या परमहंस परिव्राजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची ग्रामादिंडी व महाप्रसादाने सांगता झाली. उत्सव उत्तमरीत्या झाल्याचे देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळूपुजारी व सचिव संजय पुजारी यांनी सांगितले.
टेंबे स्वामी महाराज उत्सवकालात टेंबे स्वामी महाराज मंदिरात दररोज सकाळी ७ ते १२ यावेळेत ऋग्वेद संहिता, श्रीमद गुरुचरित्र आदींची पारायणे तसेच श्रीसूक्त, मन्यू सुक्त,सौर सुक्त, श्री गणपती अथर्वशीर्ष व रुद्र यांची आवर्तने झाली. दुपारी तीनला एकवीरा महिला मंडळाचे स्तोत्र पठण, चार वाजता वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण, युवा कीर्तनकार शरदबुवा घाग यांचे कीर्तन झाले. आज सकाळी सात वाजता टेंबे स्वामींची प्रतिमा घेऊन अभंग, पदे व विविध स्तोत्रे यांच्या लयबद्ध चालीत टाळ, मृदुंगाच्या गजरात ग्रामादिंडी काढली. दिंडीच्या स्वागतासाठी सुवासिनींनी आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. दत्त मंदिरात प्रार्थनेने दिंडीची सांगता झाली. सकाळी अकराला टेंबे स्वामी मंदिरात स्वरूप काळू पुजारी यांनी तर श्री दत्त चरणांची महापूजा ओंकार पुजारी यांनी केली. दिगंबर खातेदार पुजारी यांनी उद्धव उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली ब्राम्हण पूजन व तीर्थराज पूजन व पंचोपचार पूजन केले. यावेळी महाप्रसादाचा बारा हजार भाविकांनी लाभ घेतला. उत्सवकाळात कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून भाविकांनी हजेरी लावली. सात दिवस उत्सवासाठी विश्वस्त सदाशिव जेरे, संतोष खोंबारेपुजारी, संजय पुजारी, पांडुरंग रुकके, गजानन गेंडे, विपुल हावळे, आनंद पुजारी तसेच पुजारी व सेवेकरी मंडळी यांनी नियोजन केले.


सामूहिक घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण
कौटुंबिक सुखांची अपेक्षा न करता टेंबे स्वामी महाराजांनी स्वतःस दत्त तत्वाला वाहून घेतले. त्यांची स्तोत्रे जीवनाचा अर्थ उलगडणारी आहेत." असे प्रतिपादन प्रसिद्ध निरुपणकार विवेक गोखले यांनी केले. ते कलागंधर्व साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामूहिक घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम जनाबाई मंदिर सभागृहात झाला. अध्यक्ष बाळासाहेब आलासकर यांनी स्वागत केले. २०० महिलांनी ११ वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण केले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश फडणीस, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुजारी, सचिव मुकुंद जोशी, संचालक विलास सोनीकर, गुरुप्रसाद रिसबूड, दिगंबर मोरबाळे, पूजा जमदग्नी, तृप्ती खोंबारे, दत्तात्रय कुलकर्णी, अनिल वाडेकर, गजानन जोशी, मीरा पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्शन वडेर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com