Sun, April 2, 2023

पोहाळे उपसरपंचपदी विनायक कोडोलकर
पोहाळे उपसरपंचपदी विनायक कोडोलकर
Published on : 4 February 2023, 5:14 am
02103
पोहाळे उपसरपंचपदी विनायक कोडोलकर
पोहाळे तर्फ आळते : येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी विनायक दिनकर कोडोलकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. सुरेखा मोरे होत्या. ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीने दहा जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. निवडीवेळी सदस्य विलास साळोखे, अमोल पाटील, शैलेश चौगले, वैशाली पाटील, सुनीता डबाणे, संगीता मोटे, शोभा पोवार, सुरेखा गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीस ज्योतिर्लिंग समूहाचे अध्यक्ष निवास ढोले, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश बेनाडे, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय साळोखे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदा पोवार, माजी सरपंच दादासो तावडे यांचे सहकार्य लाभले.