जोतिबावर भाविकाला मारहाण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबावर भाविकाला मारहाण...
जोतिबावर भाविकाला मारहाण...

जोतिबावर भाविकाला मारहाण...

sakal_logo
By

जोतिबा मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून
भाविकाला बेदम मारहाण

जोतिबा डोंगर, ता. ६ ः येथील जोतिबा मंदिर परिसरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी एका भाविकाला बेदाम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आज व्हायरल झाला .
या बाबतची अधिक माहिती अशी, रविवारी डोंगरावर माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. दुपारी एक भाविक मंदिरात बैल घेऊन आला. त्यावेळी देवस्थान समितीचा एक कर्मचारी व त्या भाविकांत बाचाबाची झाली व त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. या वेळी सुरक्षा रक्षक व देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्या भाविकाला बेदम मारहाण केली. या घटनेची नोंद पोलिसांत झाली नसली तरी या घटनेचे चित्रीकरण काही भाविकांनी केले. ते आज त्यांनी व्हायरल केले. या मारहाणीबद्दल भाविक व पुजारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.