जोतिबाचे खेटे तोंडावर... तयारी मात्र शुन्य.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबाचे खेटे तोंडावर... तयारी मात्र शुन्य..
जोतिबाचे खेटे तोंडावर... तयारी मात्र शुन्य..

जोतिबाचे खेटे तोंडावर... तयारी मात्र शुन्य..

sakal_logo
By

02112
जोतिबा डोंगर ः येथे दर्शन मंडपात पडलेले साहित्य. (निवास मोटे ः सकाळ छायाचित्रसेवा)

रविवारपासून खेटे, तयारी कुठे?
जोतिबा डोंगरावरील चित्र; अपुऱ्या दर्शन मंडपात सिमेंटचा कचरा

सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. ९ ः दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या खेट्यांना रविवारपासून (ता. १२) सुरवात होत आहे; मात्र देवस्थान समितीची कोणतीही तयारी दिसून येत नाही. बैठका नाहीत. दर्शन रांगांसाठी बॅरिकेडस् लावलेले नाहीत. अपुऱ्या दर्शन मंडपात दर्शन रांगा लावणार येणार आहेत; पण मंडपात खिळे, पत्रे, सळ्या, सिमेंटची पोती पडली आहेत. अस्वच्छता असून सिमेंटचा कचरा पडला आहे. भाविकांचे पाय भाजू नयेत यासाठी मॅट अंथरलेले नाही.
दरम्यान, यंदा खेट्यांच्या निमित्ताने पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. डोंगरावर शनिवारी रात्रीपासूनच बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. डोंगर परिसर, मुख्य मंदिर तसेच डोंगर पायथ्यालाही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद होईल. त्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात होईल. तसेच मुखमार्जन, पाद्यपूजा, मंगलपाठ होतील. त्यानंतर अभिषेक सोहळा होईल. यावेळी केदार स्तोत्र, केदार महिमा या विधीचे पठण होईल. सकाळी नऊ वाजता श्रींची अंलकारिक महापूजा बांधण्यात येईल.

कोट
दर्शन मंडप स्वच्छ करण्यात येत आहे. दर्शन रांगेसाठी बॅरिकेडस् उद्यापासून लावले जाणार आहेत. शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करू. खेट्यासाठी मंदिरात बंदोबस्तासाठी जादा गार्ड मागविले आहेत.
-दीपक मेहतर, अधीक्षक,
देवस्थान समिती, समिती कार्यालय-जोतिबा.