पोहाळेतील दत्त पाणी संस्थेच्या
अध्यक्षपदी केदारी बोरचाटे

पोहाळेतील दत्त पाणी संस्थेच्या अध्यक्षपदी केदारी बोरचाटे

03108
केदारी बोरचाटे
03107
धनाजी पोवार

पोहाळेतील दत्त पाणी संस्थेच्या
अध्यक्षपदी केदारी बोरचाटे
सकाळ वृत्तसेवा
पोहाळे तर्फ आळते, ता. १४ : येथील श्री दत्त सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी केदारी परसू बोरचाटे, तर उपाध्यक्षपदी धनाजी निवृत्ती पोवार यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सर्जेराव यशवंत चौगले होते.
गटांतर्गत झालेल्या निर्णयानुसार मावळते अध्यक्ष सर्जेराव चौगले यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदासाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी सदस्य मोहन पांडुरंग पाटील, जोतिराम मिसाळ, बळवंत रामा पाटील, बाळकृष्ण छत्रे, बाबासो पोवार, हिंदुराव कांबळे, सुरेश बेनाडे, रंगराव पाटील, छाया चौगले, चंद्राबाई बाणदार, आक्काताई बोरचाटे, विश्‍वास साळोखे, निवृत्ती दत्तू पाटील उपस्थित होते. मावळते अध्यक्ष चौगले यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. अमित बेनाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी चौगले, नूतन अध्यक्ष बोरचाटे, माजी सरपंच अनिल पाटील, नागेश चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com