ध्यान धारणा करा . जीवनाचा आनंद लुटा

ध्यान धारणा करा . जीवनाचा आनंद लुटा

Published on

03111

ध्यान धारणा करा, जीवनाचा आनंद लुटा
स्वामी आनंद काडसिध्देश्वरानंद ः आळतेत कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. १६ ः आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनी ध्यानधारणा व साधना करण्याची गरज असून ती भरभरून करा व जीवनाचा आनंद लुटा; असे आवाहन आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वरानंद यांनी पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथे केले.
येथील भैरवनाथ दरा येथे असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात अखंड मौनरूप नामसप्ताह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. स्वामी म्हणाले, ‘‘आज समाजाला ध्यानधारणा करण्याची गरज आहे. अनेकांना धकाधकी जीवनामुळे अनेक व्याधी तसेच अनेक कौटुंबीक समस्यांना समोर जावे लागते. त्यातून मुक्त होण्यासाठी ध्यान धारणेची गरज आहे. ध्यानधारणा करून आनंदी जीवन जगा. केवळ सप्ताहप्रसंगी ध्यानधारणा न करता जीवनात कायमस्वरूपी ध्यानधारणा करणे गरजेचे आहे.’ या प्रसंगी माजी सभापती सीताराम चौगले, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय साळोखे, माजी जि.प. सदस्य भिवाजी काटकर, भाजपाचे किसान मोर्चा अध्यक्ष सुरेश बेनाडे प्रमुख होते. प्रारंभी स्वामी आनंद काडसिद्धेश्वरानंद यांचा सत्कार सप्ताह प्रमुख मंडळींनी केला. सप्ताहात आणे (ता. जुन्नर जि. पुणे) येथील प्रेमानंद महाराज शास्त्री तसेच नामदेव पाटील(आरळे ता.करवीर), प्रणव महाराज (रजपूतवाडी, ता. करवीर), अमृतानंद महाराज (गोरंबे ता. कागल) आदींची प्रवचने झाली. सप्ताहाचे आयोजन ज्ञानदेव पाटील, संजय बेनाडे, भिवाजी काटकर, सीताराम चौगले, शिवाजी थोरवत, अर्जुन पोवार, संभाजी साळोखे, संपतराव मोरे, दत्तात्रय कुंभार, पोपट शिर्के आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com