सरता रविवार जोतिबा वर अखेरचा पालखी सोहळा

सरता रविवार जोतिबा वर अखेरचा पालखी सोहळा

03136, 03142
...
जोतिबा देवाची बांधण्यात आलेली महापूजा.
....
जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) : येथे रविवारी रात्री नऊ वाजता सरता रविवार सोहळ्यानिमित्त झालेला पालखी सोहळ्यात संपूर्ण गाव सहभागी झाले.(निवास मोटे : सकाळ छायाचित्रसेवा)
...

सरता रविवार जोतिबा ग्रामस्थांचा
संपूर्ण गावाची पालखी सोहळ्याला हजेरी : खंडेनवमीला पुन्हा सुरू होणार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. २ : वर्षभर भाविकांच्या सेवेत असणारे जोतिबा डोंगर येथील पुजारी ग्रामस्थ आज मात्र सरता रविवार व पालखी सोहळा या निमित्ताने एकत्र आले आणि सर्वांनी मिळून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. संपूर्ण गावच या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते. आजचा हा नयनरम्य सोहळा अनेक भाविकांनी पाहिला आणि तेही भारावून गेले.
एरवी भाविकांच्या सेवेसाठी पुरणपोळ्या लाटणाऱ्या जोतिबा वरील महिला भगिनी आज पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. येथील ग्रामस्थांनी नवीन कपडे, दागिने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पुजारी महिलांनी आज आपल्या देवाला आमरस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.
जोतिबावर आजचा हा पालखी सोहळा शेवटचा असतो. पावसाळ्यात चार महिने हा सोहळा पूर्णपणे बंद असतो. मानाचे उंट-घोडेही डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) गावात विश्रांतीसाठी पाठवले जातात. तेथे त्यांच्यासाठी खास ‘थट्टी’ नावाची इमारत बांधली आहे. तेथेच त्यांची राहण्याची सोय केली आहे. त्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमले आहेत. पुन्हा हा पालखी सोहळा खंडेनवमीला सुरू होईल .
दरम्यान, आज सरता रविवार सोहळ्यानिमित्त जोतिबा देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजली गेली. मानाचे उंट घोडेही सजवले गेले. आज गर्दीमुळे डोंगरावर पोलिस बंदोबस्त होता. रात्री आठ वाजता सूचनेची एक टन वजनाची महाघंटा वाजवली गेली आणि अख्खा गाव मंदिराच्या दिशेने येऊ लागला. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाई चोपडाई काळभैरवाच्या नावानं चांगभलं,’चा अखंड जयघोष झाला. गुलाल खोबऱ्याची भव्य उधळण झाली आणि मंदिराभोवती पालखी सोहळा सुरू झाला. पालखीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी महिला व आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली. सर्व ग्रामस्थ पुजारी मात्र गुलालात न्हावून गेले. पालखीच्या मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सदरेवर विराजमान झाली. त्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते गायली. त्यानंतर मधू महालदार यांनी वैशिष्ट्यपूर्ण हाळी दिल्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. या पालखी सोहळ्यासाठी आमदार डॉ विनय कोरे, देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, विष्णुपंत दादर्णे, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, मनोज कदम, सिंधिया देवस्थानचे अधीक्षक अजित झुगर उपस्थित होते.
...
‘जोतिबा डोंगरावर दोन वर्षानंतर झालेला हा सरत्या रविवारचा पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा होता. पालखी सोहळा पाहून आम्हाला समाधान वाटले.
-शिवकन्या सिरसाट, भाविक, तेलघणा (जि. बीड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com