करवीर शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी पॅनेल विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी पॅनेल विजयी
करवीर शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी पॅनेल विजयी

करवीर शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी पॅनेल विजयी

sakal_logo
By

करवीर शिक्षक पतसंस्थेत
सत्ताधारी पॅनेल विजयी
फुलेवाडी ता. १० ः करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृष्णात कारंडे व सुरेश कोळी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी संस्थापक शिक्षक समिती पॅनल सर्व जागांवर विजयी झाले.
प्राथमिक शिक्षकांची करवीर तालुक्यातील ही प्रमुख शिक्षक पतसंस्था आहे. बजरंग खोत व महादेव महाजन यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या पतसंस्थेची बारा जागांसाठी निवडणूक लागली होती. निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल विजयी झाले. मात्र बजरंग खोत यांनी एकाकी लढत देऊन 193 इतकी लक्षवेधी मते मिळवली. सर्वसाधारण गटात डी. डी. पाटील यांनी सर्वाधिक प्रथम क्रमांकाची मते मिळवली. सी. एन. पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजय उमेदवार असे, सर्वसाधारण गट धनाजी दगडू पाटील, चंद्रकांत नारायण पाटील, राजेंद्र हिंदुराव तौदकर, यशवंत गणपती चौगुले, शशिकांत गजानन धुत्रे, प्रताप शंकर पाटील, दीपक दिनकर पाटील, संदीप हरी मगदूम, कृष्णात शिवाजी कारंडे, धनाजी तुकाराम सासणे.
इतर मागासवर्गीय प्रवर्ग सचिन मारुती पावसकर, अनुसूचित जाती प्रवर्ग बाळासाहेब शंकर कांबळे, बिनविरोध झालेली उमेदवार महिला राखीव मंगल भगवान चौगले, दीपाली दिलीप भोईटे, विशेष मागास प्रवर्ग सुकुमार लक्ष्मण मानकर.