सलग ३५ वर्षे कोल्हापूर जिल्हा अव्वल

सलग ३५ वर्षे कोल्हापूर जिल्हा अव्वल

Published on

सलग ३५ वर्षे कोल्हापूर जिल्हा अव्वल
शिष्यवृत्ती परीक्षा : शिक्षकांचे मोठे योगदान
राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ३ ः महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सलग ३५ वर्षे प्रथम स्थानावर येण्याची हुकमत कायम ठेवली आहे. गुणवत्तेचा झेंडा शिक्षकांनी कायम फडकवत ठेवला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेची पाचवीची राज्याची १२१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्याच्या यादीत २८ टक्के विद्यार्थी एकट्या कोल्हापूरचे आहेत. आठवीची १०२ विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये २६ विद्यार्थी कोल्हापूरचे आहेत. २५ टक्के विद्यार्थी जिल्ह्यातील आहेत.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषदेमार्फत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची दरवर्षी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. याशिवाय प्रत्येक तालुक्यात दरवर्षी शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होतो. लोकसहभागातून व शिक्षकांच्या सहकार्याने सराव चाचणी घेऊन प्रत्येक तालुका शिष्यवृत्तीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतो. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवायचेच या दृष्टीने पहिलीपासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
...
भुदरगड तालुक्याचे यश
अनेक वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत भुदरगड व राधानगरी या दोन तालुक्यांचे वर्चस्व राहिले. गतवर्षी मात्र कागल तालुक्याने मुसंडी मारून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळवला; पण यावर्षी पुन्हा भुदरगड तालुका अव्वल आला आहे.
...

‘शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम राहण्याची कोल्हापूर जिल्ह्याने परंपरा कायम ठेवली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन.’
- मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.