२५ बीएलओ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

२५ बीएलओ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले
Published on

असमाधानकारक काम असलेल्या
२५ बीएलओ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी, ता. २८ ः मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात बीएलओचे काम असमाधानकारक असलेल्या २५ कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश करवीर तहसीलदार स्वप्निल पवार यांनी दिले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राज्यात सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर २९ ऑक्टोंबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले मतदार हे २००२ च्या मतदार यादीमधील मतदारांशी मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो, मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करणे व इतर नोंदीची पडताळणी करून योग्य कार्यवाही करण्याचा सूचना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विविध राजकीय पक्षांची बैठक, ग्रामपंचायतना पत्र, सरकारमान्य रास्त धान्य दुकानदार, तलाठी, मंडल अधिकारी यांच्यात जागृती केली आहे. तरीही दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरिक्षण यादीचे कामकाज कमी आहे. ज्या बीएलओ कर्मचाऱ्यांचे ५०टक्के पेक्षा काम कमी आहे अशा ११ अंगणवाडी सेविका, ७ प्राथमिक शिक्षक, १ माध्यमिक शाळा लिपिक व ६ ग्रामसेवक व ग्रामपंचायत लिपिक अशा २५ कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांनी ८० टक्के कामकाज पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियमित वेतन दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com