तळंदगेतील शिबिरात १०२ जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळंदगेतील शिबिरात १०२ जणांची तपासणी
तळंदगेतील शिबिरात १०२ जणांची तपासणी

तळंदगेतील शिबिरात १०२ जणांची तपासणी

sakal_logo
By

तळंदगेतील शिबिरात
१०२ जणांची तपासणी
पट्टणकोडोली, ता. १९ : तळंदगे (ता. हातकणंगले) येथे मनवेल लिंक वर्कर प्रकल्प कोल्हापूर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली.
लोकांना निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी तळंदगे  ग्रामपंचायत, मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी संचलित मनवेल लिंक वर्कर प्रकल्प कोल्हापूर, राष्ट्रीय हिपॅटायरीस कावीळ नियंत्रण उपचार केंद्र कोल्हापूर, जिल्हा एडस प्रतिबंध नियंत्रण पथक कोल्हापूर यांच्या माध्यमातून सीपीआर कोल्हापूर मार्फत तपासणी केली. १०२ रुग्णांची मोफत एचआयव्ही, एचबी, कावीळ, थायरॉईड, डोळे तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार केले. शिबिराचे उद्‍घाटन तळंदगेचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांनी केले. डॉ. हर्षल वेदक, जिल्हा कार्य अधिकारी दीपा शिपुरकर, निरंजन देशपांडे, रमेश वर्धन, राजेंद्र भाट, गीता नाईक यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमासाठी उपसरपंच संध्याताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आदेशा मुल्ला, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पवन डांगे, डॉ. आरती भोसले, राधिका घाटगे, अर्चना लोंढे, गौस शेख, आशासेविका रेश्मा सोनवणे, अनिता सोनवणे, स्वाती कांबळे, अर्चना सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.