बजाज चेतक ईव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज चेतक ईव्ही
बजाज चेतक ईव्ही

बजाज चेतक ईव्ही

sakal_logo
By

२८०८६

बजाज चेतक ईव्ही
नव्या आकर्षक रूपात

पुणे, ता. २ ः बजाज ऑटोने दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) व्यवसायात मोठ्या बदलांची घोषणा केली असून, त्याअंतर्गत ‘चेतक’ ही ईव्ही नव्या आकर्षक रूपात सादर केली आहे. ही दुचाकी उच्च दर्जाचे साहित्य व आकर्षक रंगात उपलब्ध होणार असून, या २०२३ आवृत्तीमध्ये मोठा एलईडी कन्सोल देण्यात आला आहे.
‘बजाज’ने ईव्ही दुचाकींच्या विपणन व्यवस्थेची रचना बदलली असून, त्याद्वारे दर महिन्याला १० हजार चेतक उपलब्ध होतील व तिची किंमत कमी होऊन ती ग्राहकांपर्यंत सहज पोचेल. चेतकच्या २०२३ आवृत्त्‍यामध्ये मॅट ग्रे, मॅट कॅरिबियन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक हे तीन रंग देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रीमिअम दोन रंगातील सीट, बॉडी कलरचे आरसे आदींच्या मदतीने दुचाकीचा लुक बदलण्यात आला आहे. या दुचाकीसाठीचे बुकिंग सुरू झाले असून, ती देशातील ८५ शहरांतील १०० स्टोअर्समध्ये एप्रिलपासून उपलब्ध होईल. या ईव्ही दुचाकीची किंमत १ लाख ५१ हजार रुपयांपासून सुरू होईल.
या संदर्भात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राकेश शर्मा म्हणाले, ‘‘आम्ही चेतक ईव्हीची विपणन व्यवस्था अद्ययावत केली असून, चेतकच्या २०२३ आवृत्त्‍यामुळे त्याला मोठे बळ मिळेल. तीन नवे रंग आणि मोठ्या कन्सोलमुळे चेतक सर्वाधिक मागणी असलेली ईव्ही ठरेल.’’