
एचएफ डीलक्सची नवीन श्रेणी सादर
फोटो येणार आहे........
----------
एचएफ डिलक्सची
नवीन श्रेणी सादर
पुणे, ता. ६ ः तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत व इंधन कार्यक्षम उत्पादनांचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ सातत्याने सादर करणाऱ्या ‘हिरो मोटोकॉर्प’ या प्रख्यात कंपनीने आज त्यांची लोकप्रिय १०० सीसी मोटारसायकल-एचएफ डिलक्सची नवीन श्रेणी लाँच केली.
एचएफ डिलक्सच्या लुकमध्ये अधिक भर घातल्यामुळे मोटरसायकल आकर्षक दिसत आहे. कॅन्व्हास ब्लॅक एडिशन सुधारित सुरक्षितता व सोयीसुविधा ग्राहकांना प्रदान केल्या आहेत. या मोटारसायकलमध्ये सेल्फ व सेल्फ आय ३ एस व्हेरियंटमधील ट्यूबलेस टायर आहेत. यूएसबी चार्जरसाठी ॲक्सेसरीज असून ग्राहकांना हिरो एचएफ-डिलक्स प्रमाणित पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच मोफत सेवाही आहेत. नवीन एचएफ डिलक्स पोर्टफोलिओमध्ये मोटारसायकलची स्टाइल, सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. देशातील विश्वसनीय ब्रॅँडपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मोटारसायकलमध्ये उच्च इंधन बचत, मजबूत व शक्तिशाली इंजिन क्षमता आहे. ही मोटारसायकल देशातील हिरो मोटोकॉर्पच्या शोरूममध्ये किक व्हेरियंटसाठी ६२ हजार रुपयांपासून, तर सेल्फ-व्हेरियंटसाठी ६७ हजार ५५२ रुपयांपासून उपलब्ध आहे.
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य विस्तार अधिकारी रणजीवजीत सिंग म्हणाले, ‘‘किफायतशीर दरांमुळे हिरो मोटोकॉर्प ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. एचएफ डिलक्स तिची कार्यक्षमता, उच्च इंधन कार्यक्षमता व विश्वसनीय राइडसह देशातील सर्वांत विश्वसनीय मोटारसायकल झाली आहे.’’