इर्शाळवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

इर्शाळवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

लोगो सह............
24224
इर्शाळवाडीत घटना घडली, त्यावेळची परिस्थिती.

इर्शाळवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार
सकाळ रिलीफ फंड; ३१ मुलांना दरवर्षी मिळणार शिष्यवृत्ती

पुणे, ता. ५ : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत गेल्यावर्षी १९ जुलैला भूस्खलनाची घटना घडली होती. त्यात २७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ५७ जण बेपत्ता होते. त्यांनाही मृत घोषित केल्याने मृतांची संख्या ८४ झाली; मात्र, गावातील ३१ विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने बचावले होते. त्यांच्या शिक्षणासह इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
महाराष्ट्रात व देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य करत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत इर्शाळवाडी पुनर्वसनासाठी सकाळ रिलीफ फंडाकडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
दुर्घटनेनंतर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने इर्शाळवाडीच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे वाडीच्या पुनर्वसनासाठी जमा झालेल्या निधीतून तेथील ३१ शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी प्रतिविद्यार्थी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच, शिष्यवृत्ती उपक्रम इर्शाळवाडीच्या मुलांसाठी कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहे.
शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांना गणवेश, वार्षिक शैक्षणिक साहित्य, शिक्षणाला पूरक असलेले कोर्सेस व परीक्षा शुल्क, क्रीडा व खेळाचे साहित्य, शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकल खरेदी आदी कारणांसाठी करणार आहे.

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लोक सहकार्याच्या मदतीने ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम पुढाकार घेतला आहे. पुण्यातील पानशेत धरण फुटून आलेला महापूर, मराठवाड्यातील भूकंप, माळीण दुर्घटना अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने मदतीचा हात पुढे केला आहे. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त भागातील ३९ शाळांना इमारत दुरुस्ती, नूतनीकरण, बांधकाम व भौतिक साधनांची खरेदी आदी कामांसाठी मदत केली आहे.
- महेंद्र पिसाळ,
विश्वस्त, सकाळ रिलीफ फंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com