
संजीवनचे दोघे विद्यापीठ हॉकी संघात
03139
यशराज दिंडे
03140
शिवम खोपकर
संजीवनचे दोघे विद्यापीठ हॉकी संघात
आपटी : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील तृतीय वर्ष कॉम्पुटर सायन्स विभागातील शिवम सुजित खोपकर आणि यशराज आनंदराव दिंडे या दोन विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाच्या हॉकी संघात निवड झाली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव येथे झालेल्या निवड चाचणीमधून या दोघांची निवड झाली. वेस्ट झोन स्थरावर होणाऱ्या विद्यापीठ संघाच्या या स्पर्धा आय. टी. एम. युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे २० ते २५ जानेवारी २०२३ या दरम्यान होणार आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ. रणजित इंगवले, प्राचार्य डॉ. संजीव जैन, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, रजिस्टार बाळासाहेब कुंभार तसेच संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले व सहसचिव एन. आर. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.