Mon, Jan 30, 2023

नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपांची अज्ञाता कडून चोरी . ग्रामसेवकाकडून तक्रार दाखल-पन्हाळा तालुक्यातील कोलोलीतील प्रकार
नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपांची अज्ञाता कडून चोरी . ग्रामसेवकाकडून तक्रार दाखल-पन्हाळा तालुक्यातील कोलोलीतील प्रकार
Published on : 20 January 2023, 4:02 am
कोलोलीत नळ पाणीपुरवठा
योजनेच्या पाईपांची चोरी
आपटी : कोलोली (ता. पन्हाळा) येथील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या टाकीजवळील सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या लोखंडी पाईप अज्ञाताने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ग्रामसेवक संभाजी दादू कराळे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. कोलोली येथील गट नंबर ४५४ मध्ये ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक नळपाणी योजनेची टाकी आहे. ही नळ पाणीपुरवठा योजना दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे जुनी योजना पुनर्जीवित करण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. त्याअनुषंगाने ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी पाहणी करण्यासाठी जागेवर गेले होते. पाहणीदरम्यान त्यांना टाकीजवळील २० फुटी पाच लोखंडी पाईप कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.