म्हाळुंगेत फार्म हाऊसवर छापा- अनैतिक व्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींसह एजंट, मॅनेजर व कामगार असे सहा जण पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगेत फार्म हाऊसवर छापा- अनैतिक व्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींसह एजंट, मॅनेजर व कामगार असे सहा जण पोलिसांच्या ताब्यात
म्हाळुंगेत फार्म हाऊसवर छापा- अनैतिक व्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींसह एजंट, मॅनेजर व कामगार असे सहा जण पोलिसांच्या ताब्यात

म्हाळुंगेत फार्म हाऊसवर छापा- अनैतिक व्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींसह एजंट, मॅनेजर व कामगार असे सहा जण पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

संशयित रवींद्र कर्ले 03225
संशयित सूरज वरेकर 03226


म्हाळुंगेत फार्म हाऊसवर छापा
वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणी, एजंट, व्यवस्थापक, कामगार ताब्यात

आपटी, ता. १७ : म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथील फार्म हाऊसवर गुरुवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात वेश्या व्यावसाय करणाऱ्या तीन तरुणींसह अड्डा चालवणारे तीन युवक असे मिळून एकूण सहा जणांना ताब्यात घेऊन पन्हाळा पोलिसांच्या स्वाधीन केले.
पन्हाळा पोलिसांनी संशयित एजंट रवींद्र पांडुरंग कर्ले (वय २७, रा. वडणगे, ता. करवीर), मॅनेजर सूरज विश्वास वरेकर (वय २९) व कामगार प्रमोद आनंदा महाडिक (वय ३३, दोघे रा. म्हाळुंगे ता. पन्हाळा) यांना शुक्रवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता. २१) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, तर यातील तीन तरुणींची महिला सुधारगहात रवानगी केल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल आनंदराव सोपान पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वहातूक प्रतिबंध विभागाला मिळाली होती. त्याआधारे पथकातील काही कर्मचाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून पाठवून देऊन छापा टाकला. यात आलिशान चारचाकी गाडी, मोबाइल व वेगवेगळया नंबरची सिम कार्ड, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले आहे.