सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत संजीवनचा संघ राज्यात पहिला

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत संजीवनचा संघ राज्यात पहिला

लोगो - सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
03553
कोल्हापूर : ‘संजीवन’च्या विजयी संघासोबत प्रशिक्षक.

संजीवनचा संघ राज्यात पहिला
नागपूर विभाग संघावर मात; सर्व खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
पन्हाळा, ता. २१ : जळगाव येथे १९ व २० ऑगस्ट रोजी सुब्रोतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा झाली. स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवन विद्यानिकेतन व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने अंतिम सामना जिंकत संजीवनच्या संघाने राज्यात पहिला क्रमांक मिळविला. विजयी संघातील सर्व खेळाडू दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले.
या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागच्या १७ वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना नागपूर विभाग बरोबर झाला. सामन्यात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवन विद्यानिकेतन व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नागपूर विभागावर ५-० अशा गुणांनी विजय मिळवत यश मिळविले. यशस्वी खेळाडूंमध्ये श्रेणिक खोडके, सोहम हिंगमिरे, तन्वीर फाईमुद्दिन, पृथ्वीराज गोसावी, श्रेयस जाधव, रविराज पवार, समर्थ नन्नावरे, प्रज्वल निकम, अविनाश नोगमैथेन, टिकेंद्रजीत सलाम, चारलेस मैसानाम, रिनेल पात्सांगबम, विकास निंगथौजम, कायकू औथनाम यांचा समावेश होता. सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थापक चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, संजीवनचे क्रीडा संचालक सौरभ भोसले, फुटबॉल प्रशिक्षक अमित साळोखे, नितीन पाटील, संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवनने प्राप्त केलेल्या या राज्यस्तरीय यशामुळे संजीवन ज्ञान समूहाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com