
नृसिंह-सरस्वती बॅंकेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज सरनोबत
01456
पृथ्वीराज सरनोबत
01457
हिंदूराव पाटील
नृसिंह-सरस्वती बॅंकेच्या
अध्यक्षपदी पृथ्वीराज सरनोबत
पोर्ले तर्फे ठाणे, ता. १५ : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील श्री नृसिंह-सरस्वती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज भगवानराव सरनोबत (आसुर्ले), तर उपाध्यक्षपदी हिंदूराव संतू पाटील (आकुर्डेकर) यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षपदी सहायक निबंधक नारायण परजणे होते.
बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज नूतन संचालकांच्या बैठकीत निवडी झाल्या. या वेळी बॅंकेचे संचालक शहाजी पाटील (पडळ), नायकू खवरे (पोर्ले तर्फे ठाणे), बाजीराव खोत (खोतवाडी), कृष्णात पाटील (कुशिरे) वसंत लोंढे (पोर्ले तर्फे ठाणे), लक्ष्मण मुडेकर (वाघवे), सुभाष जाधव (तिरपण), मधुकर हिरवे (यवलूज), लक्ष्मण मगर (उत्तरे), दीपा मिसाळ (सातार्डे), राजश्री मोळे (दरेवाडी) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या वेळी उदय दुध संस्थेच्या संचालकपदी अंगद चौगुले, सर्जेराव धनगर, उत्तम खवरे, सुरेश कुंभार व विश्वास चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक के. डी. शेलार यांनी आभार मानले.