पोर्ल-ऊस पीक परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ल-ऊस पीक परिसंवाद
पोर्ल-ऊस पीक परिसंवाद

पोर्ल-ऊस पीक परिसंवाद

sakal_logo
By

01487

पोर्ले तर्फे ठाणेत
ऊस पीक परिसंवाद
पोर्ले तर्फे ठाणे ः पोर्ले तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथे संयुक्त शिवजयंती उत्सव समिती, दत्त दालमिया साखर कारखाना आसुर्ले पोर्ले यांच्या मार्फत नेदरलँड् सॉलीडरी डॅड यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी असि.जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील होते. प्रमुख वक्ते निवृत्त शेतीतज्ज्ञ सुरेशराव माने- पाटील यांनी ऊस शेती कशी करावी, मशागत, सरी कशी, किती फूट असावी, बेणे कसे निवडावे, दोन टिपरीतील अंतर, दोन डोळ्यांमधील अंतर, पाण्याची पध्दत, खताची मात्रा, खोडवा व्यवस्थापन, कीड व हुमणी नियंत्रण यासंदर्भात माहिती दिली. यावेळी दालमिया कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जास्त उत्पादन घेणारे दत्तात्रय माने, निवास पाटील यवलूज, बाळासो कदम, बाजीराव साळोखे पोर्ले, शहाजी पाटील, उदय पाटील उंड्री, प्रमोद गोळे, नारायण गोळे केर्ले, शहाजी पवार पुनाळ यांचे अभिनंदन केले. यावेळी मदतनीस बाबासाहेब बंके, सत्यजित पाटील, गणा जाधव, प्रसाद मिरजकर, नीता गायकवाडसह शेतकरी उपस्थित होते. सरदार चौगुले यांनी आभार मानले.