
पोर्ले-मसाई मंदिर बातमी
01531
मसाईदेवी मंदिर, पैजारवाडीच्या
चिले महाराज मंदिरास ''ब'' वर्ग
पोर्ले तर्फे ठाणे.ता.२७- पोर्ले तर्फे ठाणे (ता.पन्हाळा) येथील श्री मसाईदेवी मंदिर व पैजारवाडी येथील परमपूज्य सदगुरु चिले महाराज समाधी मंदिरास ''ब'' वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे, माजी जि.प सदस्य प्रकाश पाटील व पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत यांच्या सहकार्यातून ''ब''वर्ग प्राप्त झाला.
२३ मार्च २०२३ रोजीच्या बैठकीत निकषाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करून ''क''वर्ग तीर्थक्षेत्रास वरचा दर्जा देऊन ''ब''वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिला आहे. यात चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील फक्त दोनच तीर्थक्षेत्राला ''ब'' वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.त्यात पोर्ले तर्फे ठाणे येथील श्री मसाई देवी मंदिर व पैजारवाडी येथील सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर.यांचा समावेश आहे. ''ब'' वर्ग दर्जा मिळविण्यासाठी २०१९ पासुन ग्रामपंचायतीसह आमदार डॉ विनय कोरे यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद माजी सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा पंचायत समिती माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, कॉन्ट्रॅक्टर व नृसिंह-सरस्वती बॅंकेचे संचालक वसंत लोंढे यांचा पाठपुरावा सुरू होता. सहकार्याने या मंदिरास ''ब''वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.तसेच सहकार्य लाभले.