पोर्ले-अपघात

पोर्ले-अपघात

बगॅस ओढत असताना
पडून कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले येथील सहवीज प्रकल्प व डिस्टलरी प्रकल्पाच्या बॅायलरला बगॅस ओढत असताना खाली पडून जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. फराज नुरमहमद मिया (वय ५९, रा. नंदवारा, ता. बरमिनिया, जि. सितामनी, बिहार) याबाबत सीपाआर पोलिस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फराज नुरमहमद महिन्यापूर्वी रोजगारासाठी दालमिया साखर कारखान्यात आला होता. बुधवारी रात्री कामावर असताना बगॅस ओढताना त्यांचा तोल जाऊन ते जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी घोषित केले. याबाबत त्यांच्या जावई शमशाद नबिजान महमद यांनी वर्दी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com