पोर्ले -शाहू जयंती

पोर्ले -शाहू जयंती

Published on

ऐतिहासिक चहाची मळी
देवाळे : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीचे प्रतीक असणाऱ्या ऐतिहासिक चहाची मळी परिसराचे संवर्धन गरजेचे असून त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत गोकुळ संचालक डॉ. चेतन नरके यांनी केले. बांधारी मित्र फौंडेशनतर्फे मसाई पठाराजवळील चहाच्या मळीमध्ये शाहू जयंती झाली. वेखंडवाडीचे सरपंच संतोष खोत उपस्थित होते. यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भीमराव पाटील, आशिष पाटील, जेऊर ग्रामपंचायत सदस्य निरंजन सरवदे, मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा हिरवे, जयवंत खेतल, पोलिसपाटील जितेंद्र रणभिसे, धनाजी पाटील, सागर खेतल, महेश खेतल, भगवान पाटील, भैरव गोसावी, राजवर्धन पाटील, संजय डावरे, अमर संकपाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आसुर्ले पोर्ले परिसर
पोर्ले तर्फे ठाणे : ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच छाया युवराज कांबळे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी सदस्य शहाजी खुडे, एम. एम. पाटील, नंदकुमार गुरव, ग्रामविकास अधिकारी शहाजी शेलार, युवराज कांबळे व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत आसुर्लेत माजी सरपंच भगवानराव पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी संभाजी पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्राथमिक शाळा पोर्ले, प्राथमिक शाळा आसुर्ले, न्यू इंग्लिश स्कूल पोर्ले, आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमापूजन झाले.

गडमुडशिंगी ग्रामपंचायत
उजळाईवाडी : गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी संजय पाटील, सचिन पाटील, बागल कामत, रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, संजय सकटे, दिलीप थोरात, राहुल सूर्यवंशी, बाबुराव सोनुले, सुरज कांबळे, राहुल गिरुले यांच्यासह उत्तम पाटील, अरविंद शिरगावे, सुकुमार देशमुख, संतोष कांबळे, भानुदास कांबळे, किसन ठमके, संदीप गौड, बाळासो कांबळे, दादा पाटील, युवराज पाटील, मुरली माळी यांचीही उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com