Sun, Feb 5, 2023

वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य व वस्तूंची भेट
वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य व वस्तूंची भेट
Published on : 9 January 2023, 12:05 pm
1780
पिंपळगाव ः शाळेत भेटवस्तू देताना जोतिबा सुतार, शिक्षक व मान्यवर.
वाढदिनी शाळेस भेटवस्तू
पिंपळगाव ः केळेवाडी (ता. भुदरगड) येथील जोतिबा दत्तू सुतार यांनी वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेस विविध भेटवस्तू, शैक्षणिक साहित्य भेट दिले. वाढदिवसानिमित्त शाळांची गरज ओळखून त्यांनी विद्यामंदिर केळेवाडी शाळेस दोन सिलिंग फॅन, भांडेबांबर शाळेस सिलिंग फॅन व तोंदलेवाडी शाळेस चार खुर्च्या अशा भेटवस्तू दिल्या. शाळा व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. यावेळी जोतिबा सुतार, सतीश गाडेकर, अर्जुन पाटील, आशा शेटे, मारुती वरपे, सुनंदा चव्हाण उपस्थित होते. मारुती वरपे यांनी आभार मानले.