प्रयाग महापर्व काळास सुरुवात. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रयाग महापर्व काळास सुरुवात.
प्रयाग महापर्व काळास सुरुवात.

प्रयाग महापर्व काळास सुरुवात.

sakal_logo
By

प्रयागः येथे महापर्वकाळ सुरू होताना सूर्यास अर्ध्य देताना भाविक.
00755
....

प्रयाग स्नान यात्रा सुरू

प्रयाग चिखली, ता. १५ : प्रयाग संगमावरील स्नान पर्वकाळास आजपासून सुरुवात झाली असून पुढे एक महिनापर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे.
कोल्हापूरच्या पश्चिमेस अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या श्री क्षेत्र ‘प्रयाग’ या ठिकाणी कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, आणि धामणी या पाच नद्यांचा संगम झालेला आहे. हेच पंचगंगेचे उगमस्थान आहे. या ठिकाणाहून पंचगंगा नदी कोल्हापूरच्या दिशेने वाहत जाते. संगम ठिकाणी दरवर्षी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश होत असताना संगमावरील स्नानाचा महापुण्य पर्वकाळ सुरू होतो.
आज सकाळी सात वाजता दत्तात्रयांची पालखी गंगेवर स्नानास गेली. स्नान झाल्यानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये आरती झाली. आज रविवार असल्याने हजारो भाविकांनी स्नान दर्शनाचा लाभ घेतला.