पेठवडगाव:टोपच्या व्यक्तीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:टोपच्या व्यक्तीची आत्महत्या
पेठवडगाव:टोपच्या व्यक्तीची आत्महत्या

पेठवडगाव:टोपच्या व्यक्तीची आत्महत्या

sakal_logo
By

सिद्धोबा डोंगर परिसरात
टोपच्या एकाची आत्महत्या

पेठवडगाव, ता.७: मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथील सिद्धोबा डोंगरात अशोक शामराव कुरणे (वय ४२, रा. टोप) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
   याबाबत अधिक माहिती अशी, मौजे तासगावमधील ‘खारवत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी शेती क्षेत्र आहे. या ठिकाणी जळण गोळा करण्यासाठी एकजण गेला होता. दरम्यान, एका झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तासगावात ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी याबाबत वडगाव पोलिसांना कळविताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील अशोक कुरणे हे बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. त्यांचे नातेवाईक व टोपचे माजी उपसरपंच विश्वास कुरणे आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पतंगराव रेणुसे, सतीश सुतार, राजू पाटील, पठाण यांनी तपास केला.