श्रीरामकृष्णदेव जन्मतिथी आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामकृष्णदेव जन्मतिथी आजपासून
श्रीरामकृष्णदेव जन्मतिथी आजपासून

श्रीरामकृष्णदेव जन्मतिथी आजपासून

sakal_logo
By

श्रीरामकृष्णदेव जन्मतिथी आजपासून
पेठवडगाव ःभादोले (ता. हातकणंगले) येथील श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्रातर्फे शनिवार (ता. १८) ते मंगळवार (ता. २१) पर्यंत भगवान श्रीरामकृष्णदेव यांचा जन्मतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. पूज्य स्वामी सेवानंद, डॉ. विशाल पाटील, डॉ सुरेंद्रकुमार काटकर (कार्यकारी अभियंता, ग्रामीण रस्ते विकास संस्था, कोल्हापूर) यांची व्याख्याने होणार आहेत. मंगळवारी मुख्य दिवशी प्रसिद्ध व्याख्याते अभय भंडारी, विटा यांचे भारतीय संस्कृती व श्रीरामकृष्ण याविषयी व्याख्यान होणार आहे. तसेच त्या दिवशी बंगाली खिचडी व पायस महाप्रसादाचे नियोजन केले आहे. सायंकाळी श्रीराम व श्रीकृष्ण यांचा जीवनावर आधारित रामकृष्ण नृत्यांजली हा भरतनाट्यम कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पूज्य स्वामी सेवानंद यांनी केले आहे.