Wed, March 29, 2023

गुरूकुल विद्यालयात शिवचरित्र पारायण
गुरूकुल विद्यालयात शिवचरित्र पारायण
Published on : 19 February 2023, 11:29 am
गुरुकुल विद्यालयात शिवचरित्र पारायण
पेठवडगाव, ता. १९ : जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांतून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्व आदर्शवत होईल, यात मुळीच शंका नाही, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर यांनी केले.
येथील आदर्श गुरुकुल विद्यालय येथे गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक दत्तात्रय घुगरे, सचिव सौ. महानंदा घुगरे, प्रिन्स मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, उपप्राचार्य एम. ए. परीट उपस्थित होते. छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनचे अध्यक्ष राजेंद्र माने, डॉ. दीपक शेटे, जगदीश कुडाळकर, चंद्रकांत नेर्लेकर, एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे सुनील पाटील, डॉ. अंजना जाधव उपस्थित होते. अमर इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.