यादव महाविद्यालयास ए प्लस मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यादव महाविद्यालयास ए प्लस मानांकन
यादव महाविद्यालयास ए प्लस मानांकन

यादव महाविद्यालयास ए प्लस मानांकन

sakal_logo
By

यादव महाविद्यालयास
ए प्लस मानांकन
पेठवडगाव, ता. २३ : येथील विजयसिंह यादव महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्याकंन आणि मान्यता परिषद नॅक कडून ए प्लस मानांकन प्राप्त झाले. युजीसीकडून देशातील विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन केलेल्या नॅककडून महाविद्यालयाला स्थापनेनंतर अवघ्या तेविसाव्या वर्षी ए प्लस मानांकन मिळाले. असे मानांकन मिळवणारे विद्यापिठातील तिसरे महाविद्यालय आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाला भेट देणाऱ्या नॅक समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकृष्ण नायडू (आंध्रप्रदेश), समन्वयक डॉ. सॅम रिझवी (नवी दिल्ली), समिती सदस्य प्रा.बशीर अहमद दार(जम्मू काश्मीर)होते.यासामितीने महाविद्यालयातील शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधांची पहाणी केली.विविध शिक्षण उपक्रम, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे विविध उपक्रम यांचा विद्यार्थी व समाजास झालेला लाभ याची माहिती घेतली. यासाठी त्यांनी महाविद्यालय परिसर पाहणी, संस्था पदाधिकारी, विद्यार्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.
महाविद्यालयातील अध्यापन, अध्ययन मूल्यमापन, संशोधन, क्रीडा व ग्रंथालय विभागातील उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत विद्यार्थी विकास उपक्रमांचे मूल्याकन केले. विविध विभाग व सामित्यामार्फत आयोजित विद्यार्थी केंद्रीभूत उपक्रम, समाजाभिमुख उपकृत पायाभूत सोयीसुविधांची पाहणी करून मुल्याकंन केले. याबाबत सामितीने समाधान व्यक्त केले. तसेच अधिकच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन सुचना केल्या आवश्यक बदलही सुचवले. याकामी उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी विजयसिंह यादव, सचिव विद्या पोळ, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. विजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नॅक सामिती समन्वयक डॉ. सी. बी. माने, सहसमन्वयक डॉ. डी. जे. भंडारे आदिंनी परिश्रम घेतले. या पत्रकार परिषदेस अमोल हुकेरी, उद्योजक कांचन फडणीस, संभाजी माळी, नितिन दिंडे, संजय सुर्यवंशी उपस्थित होते.