पेठवडगाव: साखरेने भरलेला ट्रकची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव: साखरेने भरलेला ट्रकची चोरी
पेठवडगाव: साखरेने भरलेला ट्रकची चोरी

पेठवडगाव: साखरेने भरलेला ट्रकची चोरी

sakal_logo
By

ट्रकसह २२० क्विंटल साखरेची चोरी
पेठवडगाव, ता.१६ : साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामध्ये सात लाख ३७ हजार रुपये किमतीची २२० क्विंटल साखर व आठ लाख रुपये किमतीचा ट्रक चोरीस गेला. ही घटना सोमवारी (ता.१३) रात्री घडली. याबाबतची नोंद पेठवडगाव पोलिसांत झाली आहे.
याबाबत माहिती अशी ः ट्रकमालक  नितीन अनिल हाके (रा. हाके नेमळा, कारंदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी रविवारी (ता.१२) राजारामबापू सहकारी साखर कारखाना, कारंदवाडी येथून ४४० पोत्यांतून २२० क्विंटल साखर ट्रक (एम एच १४ ई एम ८८००) मध्ये भरून तो जयगडला निघाले होते. दरम्यान, सोबत चालक नसल्यामुळे वाठार येथील बायपास रोडवर बालाजी ट्रेडर्सजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ट्रक पार्किंग करून ते कारंदवाडीला गेले. दरम्यान, ते सोमवारी (ता.१३) ट्रक पार्किंग केलेल्या ठिकाणी आले असता तेथे ट्रक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी बुधवारी रात्री चोरीची फिर्याद पेठवडगाव पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.
........................