प्रिमियर लिग क्रिकेट सामणे

प्रिमियर लिग क्रिकेट सामणे

02264

अविनाश जाधव वॉरियर्स संघ विजेता
वडगाव प्रीमियर लीग ः वास्तुटेक कन्स्ट्रक्शन उपविजेता

पेठवडगाव, ता. ५ : येथील वडगाव क्रिकेट असोसिएशन व आयोजन कमिटी २०२३ च्यावतीने घेण्यात आलेल्या वडगाव प्रीमियर लीग-२०२३ पर्व ४ थे चे विजेतेपद अविनाश जाधव वॉरियर्स संघाने पटकावले. या संघाने अंतिम सामन्यात वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा आठ गडी राखून पराभव केला. या विजेता संघास माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते ६१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
उपविजेते वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाला श्रुती स्कॅनचे डॉ. राजेंद्र चिंचणेकर यांच्या हस्ते ५१ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक संतोष माने चॅलेंजर संघाला वैष्णवी ज्वेलर्सचे मालक प्रमोद पाटील आणि शांतीलाल मोतीलाल राठोड कापड दुकानचे मालक जुगल राठोड यांच्या हस्ते ४१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ म्हणून जगदंब स्पोर्टस् संघाला विजय भोसले यांच्याकडून गौरविण्यात आले.
याप्रसंगी वडगाव क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष संताजी भोसले म्हणाले, ‘प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहाने गावातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होतात. जिद्द, ईर्ष्या, जोर लावून रोमहर्षक खेळ खेळला जातो.’ वडगाव क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. सूरज कुडाळकर म्हणाले, ‘यावर्षी सर्वच खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत चांगला खेळ केला. सर्व संघ मालकांनीही उत्तम सहकार्य केले आणि स्पर्धेचा आनंद घेतला.’
अंतिम सामन्यास व बक्षीस वितरण कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, डॉ. संदीप निकम, डॉ. प्रमोद भोई, उद्योजक संतोष लडगे, सचिन कुडाळकर, रोहित माळी, नंदकुमार बेलेकर, अमित राठोड, सचिन पाटील, महेश पाटील यांच्यासह दहा संघांचे मालक, संचालक उपस्थित होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी दर्शन सणगर, सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.
-----------------
चौकट
वैयक्तिक विजेते -
ऑरेंज कॅप एलईडी टीव्हीचा मानकरी वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा खेळाडू तानाजी सलगर, पर्पल कॅप एलईडी टीव्हीचा मानकरी वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा खेळाडू रमेश गोसावी तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) स्पोर्टस् सायकलचा मानकरी कुडाळकर गोल्डन ईगल संघाचा खेळाडू रमेश गोसावी ठरला. स्पर्धेतील पहिले अर्धशतक राज पाटील वॉरियर्स संघाचा कर्णधार रवी पाटील, स्पर्धेतील पहिले शतक अविनाश जाधव वॉरियर्स संघाचा कर्णधार ऋतुराज चव्हाण तर स्पर्धेतील पहिला सलग तीन बळी टिपणारा खेळाडू वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा रमेश गोसावी ठरला.स्पर्धेतील उत्कृष्ट झेल वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा खेळाडू ओंकार लोहार याचा ठरला तर अंतिम सामन्यात अविनाश जाधव वॉरियर्स संघाचा खेळाडू इरफान पटेल सामनावीर ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com