विद्यार्थ्यांनी पाहिला ‘कल्टी’ चित्रपट

विद्यार्थ्यांनी पाहिला ‘कल्टी’ चित्रपट

विद्यार्थ्यांनी पाहिला ‘कल्टी’ चित्रपट
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २ : येथील निसर्गप्रेमी मित्र व राम सिटी प्लेक्सतर्फे चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, कोल्हापूर मोफत सिनेमा दाखवण्याच्या चळवळीचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘कल्टी’ हा मराठी चित्रपट दाखवला. यानिमित्त सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक किरण पोटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एक वर्षात संघटनेने १२ प्रेरणादायी चित्रपट दाखवले आहेत. ही चळवळ आता कराड येथे सुरू आहे.
पेठवडगाव आणि परिसरातील २५० हून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. क्रेझी आइस्क्रिमकडून विद्यार्थ्यांना पाहिलेल्या सिनेमातून मिळालेल्या मूल्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी वह्या आणि पेन वाटले. आदर्श गुरुकुलच्या महानंदा घुगरे, सुनील मकोटे, डॉ. विशाल बेळे, अनिल कटकुळे, देवदूत लोले आदी उपस्थित होते. डॉ. नीलिमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमोल पाटील यांनी आभार मानले.
---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com