पेठवडगाव:नाभिक समाजाच्या वतीने पालिकेचा निषेध

पेठवडगाव:नाभिक समाजाच्या वतीने पालिकेचा निषेध

नाभिक समाजातर्फे
पेठवडगावला निषेध
पेठवडगाव, ता. १० : पेठ वडगावातील माणिकनगरकडे जाणा-या रस्त्यावर वीर शिवा काशीद यांची कमान न लावता तेथे कचरा टाकला आहे. त्यामुळे नाभिक समाजाच्या वतीने पालिकेचा निषेध करण्यात आला. हलगर्जीपणा करणा-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी; या मागण्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनातील आशय असा; हरात आयुर्वेदिक काॅलेज व माणिक नगर दरम्यान सिटी सर्व्ह नंबर २०२ व २०३ मधून काशिद कुटुंबातील नागरिकांनी १७ गुंठे जागा रस्त्यासाठी दिली आहे. यावेळी पालिकेने स्वागत कमान लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ठराव करून पालिकेने कमान तयार केली.परंतु कमान नियोजित ठिकाणी उभी न करता पालिकेमध्येच ठेवली. मागणीची पूर्तता सात वर्ष झालेली नाही. सध्या कमानीवर कचरा, पाला, पत्रा टाकला आहे. हे समजताच नाभिक समाजाने ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. नियोजित ठिकाणी तत्काळ कमान उभी करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर नाभिक समाजाचे अध्यक्ष शरद काशिद, सदाशिव काशिद, अशोक काशिद, श्रीधर काशिद, श्रीकृष्ण काशिद, संदीप काशिद, सौरभ काशिद उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com