शितल पाटीलला ग्रंथ वाचन पुरस्कार. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शितल पाटीलला ग्रंथ वाचन पुरस्कार.
शितल पाटीलला ग्रंथ वाचन पुरस्कार.

शितल पाटीलला ग्रंथ वाचन पुरस्कार.

sakal_logo
By

03517
कोतोली ः मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शीतल पाटील.

शीतल पाटीलला ग्रंथमित्र पुरस्कार
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी शीतल रघुनाथ पाटील हिला ग्रंथवाचनाबद्दल पुरस्कार मिळाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये बीए भाग दोनमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तसेच बी.ए. ,बी.एस्सी, बी.व्होक या तिन्ही शाखांमध्ये सर्वात जास्त ग्रंथ वाचन करणारी विद्यार्थिनी म्हणून ग्रंथ मित्र पुरस्कार देण्यात आला. श्रीमती मनीषा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मधुकर पाटील, संस्थाध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, संस्था सचिव शिवाजीराव पाटील, संचालिका श्रीमती कल्पनाताई चौगुले, डॉ. जे. के. पवार उपस्थित होते.