कोतोली महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोली महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा
कोतोली महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

कोतोली महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

sakal_logo
By

कोतोली महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्टस्‌ अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी येथे वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजशास्त्र विभागातर्फे स्पर्धा झाल्या. ‘विवाह पद्धतीचे स्वरूप’ या विषयावर वादविवाद स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन प्र. प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांक आरती पाटील, द्वितीय क्रमांक विभागून मयुरी संकपाळ व किरण यादव, तृतीय क्रमांक सायली तांबवेकर यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डी. एच. नाईक यांनी काम पाहिले. डॉ. एस. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आरती पाटील हिने आभार मानले.