
पुनाळच्या हनुमान दूध संस्थेवर नरके गटाची सत्ता:
पुनाळच्या हनुमान दूध संस्थेवर नरके गटाची सत्ता
पुनाळ, ता. १५ : येथील हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये सत्तारुढ चंद्रदीप नरके गटाने एकहाती सत्ता मिळवत ११ - ० अशा फरकाने विरोधकांचा धुव्वा उडविला. या निवडणुकीत श्री हनुमान सत्तारुढ पॅनेलच्या विरुद्ध श्री हनुमान परिवर्तन विकास आघाडी रिंगणात होती. एकूण ४२६ सभासदांपैकी ४०२ एवढ्या सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. ९५ टक्के मतदान चुरशीने झाले. सतारुढ गटाकडून विजयी झालेले उमेदवार व मिळालेली मते अशी: राजाराम चव्हाण(२३४) , वसंत चव्हाण (२३०) , कृष्णात चौगले (२११), शहाजी चौगले (२३१), हिंदूराव मगदूम (२२०), विश्वास साळोखे (२२८) , मनीषा कारंडे (२२६),सुमन पाटील (२६६), हिंदूराव पाटील (२५२) , कृष्णात कांबळे(२३७). सत्तारुढ गटात सात विद्यमान संचालकांना नव्याने संधी दिली होती. तर तीन नवे उमेदवार दिले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. चिकणे यांनी काम पाहिले.