Wed, March 29, 2023

साधना हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ.
साधना हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ.
Published on : 9 February 2023, 4:14 am
साधना हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
पुनाळ : कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या साधना हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी श्री.ओतारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रेचे बी. आर. अकिवाटे होते. पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन झालेले. पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस. एम. लाड यांनी केले. विविध स्पर्धांमधील यशस्वीतांचा सत्कार झाला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यंनी कलागुणांचे सादरीकरण केले. वंदना चौगले, यु. बी. बंके, हिर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. जाधव यांनी आभार मानले.