
मतदारसंघातील प्रत्येक गावाला निधी - पी.एन पाटील. पुनाळला ग्रामसचिवालयाचे उद्घाटन.
03742
मतदारसंघातील प्रत्येक
गावाला निधी - पी. एन पाटील
पुनाळला ग्रामसचिवालयाचे उद्घाटन
पुनाळ, ता. ३१ : मतदारसंघातील २३६ वाड्यावस्त्यांच्या मूलभूत विकासाचे स्वप्न सत्यात उतरवत असल्याचा अभिमान आहे. उर्वरित कार्यकालात प्रत्येक गावाला निधी देणार असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले. येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. पी. एन. पाटील म्हणाले, ‘आम्ही विकास केला हे दाखवून देण्यासाठी गावोगावी डिजिटल लावत नाही. केलेल्या व न केलेल्या कामाचा गाजावाजा करण्याची सवय नसल्याची टीका नाव न घेता चंद्रदीप नरके यांच्यावर केली.
ग्रामसचिवालयासाठी आमदार पाटील यांनी दहा लाख व विनय कोरे यांनी दहा लाख व पंधरा वित्त आयोगातून सतरा लाखांची सुसज्ज इमारत उभी केल्याबद्दल गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी आभार मानले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शृतिका काटकर, भरत मोरे, शाहू काटकर, आनंदा पाटील, शामराव पाटील, सरदार बाडे, सर्जेराव पाटील, सरदार पाटील, शिवाजी चौगले, बाजीराव झेंडे, उदय चव्हाण, बापू म्हाळुंगेकर, कृष्णात पवार, गिरीश पाटील, संभाजी पाटील, बळवंत चौगले, शहाजी चव्हाण, संभाजी पवार,महेश पाटील, अरविंद बोळावे, यल्लाप्पा पोवार व ग्रामस्थ उपस्थित होते. विक्रांत पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन, सरपंच युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी आभार मानले.
विकासकामांसाठी आणखी दहा लाख
ग्रामसचिवालयासाठी दिलेला निधी योग्य कारणी लागला. रस्त्याची पाहणी करुन विकासासाठी आणखी दहा लाखांचा निधी पी. एन. पाटील यांनी
जाहीर केला.