कोतोलीत चौगुले महाविद्यालयात व्याख्यान. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोलीत चौगुले महाविद्यालयात व्याख्यान.
कोतोलीत चौगुले महाविद्यालयात व्याख्यान.

कोतोलीत चौगुले महाविद्यालयात व्याख्यान.

sakal_logo
By

कोतोलीत चौगुले महाविद्यालयात व्याख्यान
पुनाळ : श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता. पन्हाळा) येथे व्याख्यान आयोजित केले होते. येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्टाफ अॅकॅडमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामानातील बदल आणि हवामान अंदाज’ विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील होत्या. मार्गदर्शन करताना डॉ. भरत पाटील म्हणाले, ‘प्राचीन काळापासून होणारे हवामान बदल ही प्रक्रिया असून भविष्यातही हवामनातले बदल होत राहतील. त्याचे वाईट परिणाम हे मानवी समाज आणि पर्यावरणाला सहन करावे लागतील.’ कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. यु. एन. लाड यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. एम. एच. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. जी. कांबळे यांनी आभार मानले.