Fri, Sept 22, 2023

पुशिरेतील अंतर्गत रस्त्यासाठी पंचवीस लाख मंजूर.
पुशिरेतील अंतर्गत रस्त्यासाठी पंचवीस लाख मंजूर.
Published on : 7 June 2023, 1:18 am
03949
पुशिरे ः रस्ता कामाचे उदघाटन करताना मान्यवर.
...
पुशिरेतील अंतर्गत रस्त्यासाठी पंचवीस लाख मंजूर
पुनाळ : पुशिरे तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील अंतर्गत रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे यांच्या पुढाकाराने खासदार धनंजय महाडिक व आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून हा फंड उपलब्ध झाला आहे. अजूनही परिसरातील गावांसाठी विविध कामांसाठी खासदार महाडिक व आमदार कोरे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार असल्याचे घोरपडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. संगीता निंबाळकर,सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, लाल बावटा संघटनेचे अध्यक्ष भगवान घोरपडे, अनिल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.