आसगाव येथे युवकाची आत्महत्या

आसगाव येथे युवकाची आत्महत्या

04512
...
आसगाव येथे अकरावीच्या युवकाची आत्महत्या
पुनाळ: आसगाव (ता.पन्हाळा) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुराज विलास पाटील (वय १६ ) असे त्याचे नाव आहे. सीपीआर पोलिस चौकीत या बाबतची नोंद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऋतुराज हा कोल्हापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. काही दिवस झाले तो घरी आला होता. गुरुवारी (ता.१२) त्याने शेतामध्ये तणनाशकाची फवारणी केली. नेहमीप्रमाणे तो रात्री झोपण्यासाठी नवीन बांधलेल्या घरात गेला होता. सकाळी उठून तो फिरून आला व माळ्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. बराच उशिरापर्यंत ऋतुराज घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्याचे चुलते आनंदराव पाटील यांनी नवीन बांधलेल्या घरात पाहणी केली असता त्यांना ऋतुराजचा मृतदेह माळ्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबीयांनी ऋतुराजला सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले. पण तपासणीअंती त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी, दोन चुलते, चुलती, चुलत भाऊ असा परिवार आहे.  ्रक्षाविसर्जन रविवारी (ता.१५) रोजी सकाळी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com