पुशिरे फाट्यावरील मारहाणप्रकरणी नऊ जणांना अटक

पुशिरे फाट्यावरील मारहाणप्रकरणी नऊ जणांना अटक

पुशिरे मारहाणप्रकरणी
नऊ जणांना अटक
पुनाळ, ता. ८ : पुशिरे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील फाट्यावर पुनाळ-तिरपण धरणाजवळ चार जून रोजी माजनाळ येथील युवकाला मारहाण झाली होती. याप्रकरणी म्हाळुंगे येथील नऊ संशयितांना कळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‌
याबाबत अधिक माहिती अशी, एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून माजनाळ येथील अभिषेक कृष्णात पाटील (वय २५) याला मारहाण झाली होती. अभिषेक कोतोलीहून आपल्या माजनाळ गावी येत असताना चार जून रोजी रात्री आठच्या सुमारास त्याला मारहाण झाली होती. यामध्ये हॉकी स्टिक, लोखंडी गंज, पट्टा यांचा वापर केला होता. रस्त्यावरून जाणारे अरविंद पाटील व तुषार पाटील यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले होते. अभिषेकला सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले होते. पाच जूनला यबाबत अभिषेकच्या फिर्यादीवरून ओंकार मारुती पाटील, पंकज भगवान पाटील, रोहन तानाजी मुजुमदार, ऋषिकेश अशोक कांबळे, विशाल वसंत पाटील, विकास वसंत पाटील, संतोष सुभाष कांबळे, हर्षद नामदेव पाटील, विकास शहाजी पाटील (सर्व रा.म्हाळुंगे तर्फ बोरगाव) या नऊ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मारहाणीसाठी वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com