रांगोळीच्या कुस्तीमैदानात माऊली जमदाडे विजयी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळीच्या कुस्तीमैदानात माऊली जमदाडे विजयी.
रांगोळीच्या कुस्तीमैदानात माऊली जमदाडे विजयी.

रांगोळीच्या कुस्तीमैदानात माऊली जमदाडे विजयी.

sakal_logo
By

00170

माऊली जमदाडेला ‘ब्रह्मनाथ केसरी’चा बहुमान
रांगोळीतील मैदान; लहान-मोठ्या ९४ कुस्त्या

रांगोळी ता. २८ ः येथील ब्रह्मनाथ यात्रा व गैबीसाहेब उरुसानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान झाले. यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे विरुद्ध गणेश जगताप यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत गणेश जगतापच्या पायाला दुखापत झाल्यामुळे माऊली जमदाडेला विजयी घोषित केले. यावेळी माऊलीला ब्रह्मनाथ केसरीचा बहुमान व मानाची चांदीची गदा दिली.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ग्रामपंचायत रांगोळी व शाहू तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने यात्रेनिमित्त कुस्त्याचे जंगी मैदान झाले. लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे, उपसरपंच सविता मोरे व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून कुस्तीला प्रारंभ झाला. यावेळी लहान-मोठ्या एकूण ९४ कुस्त्या झाल्या. लहान पैलवानानी केलेल्या चटकदार कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. दोन नंबरची कुस्ती भारत मदने बारामती विरुद्ध पैलवान योगेश पवार पारनेर यांच्यामध्ये झाली. उशिरापर्यंत चालेली कुस्ती अखेर पंचानी बरोबरीत सोडवली. शंकर पुजारी यांच्या पहाडी आवाजातील निवेदन व हालगीच्या कडकडात जोशपूर्ण वातावरण तयार झाले होते. यानंतर प्रथम क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे विरुद्ध गणेश जगताप यांच्यात झाली. दोन ते तीन मिनिटे चाललेल्या कुस्तीत गणेश जगतापच्या पायाला दुखापत झालेमुळे माऊलीला विजयी घोषित केले. जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. अशोकराव माने व अमित गाठ यांच्या हस्ते माऊली जमदाडेला चांदीची गदा व ब्रह्मनाथ केसरीचा किताब देण्यात आला
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, तानाजी सादळे, दादासो पाटील, सुभाष नरदे, अनिलकुमार जंगले, अमृत भोसले, मोहन सादळे, कृष्णात सादळे, चंद्रकांत देसाई, बंडोपंत सादळे, भाऊसो मोरे, रावसो साळुंखे, भोला हावलदार, शांतीनाथ शेटी, राकेश देसाई,अण्णासो गुंडे, राजेंद्र हालोंडे उपस्थित होते. कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीशौकीन व ग्रामस्थ उपस्थित होते.